बलात्कार-संस्कृती थांबवायची असेल, तर स्त्रीचा आदर करणारी पर्यायी संस्कृती रुजवायला हवी...
बलात्कार हा स्त्रियांवरील हिंसाचारापैकीच एक. माणूस म्हणून स्त्रीचा अनादर करणारा तीव्र स्वरूपाचा अत्याचार. बलात्कारामध्ये अनुस्युत काय आहे? तर बळाचा वापर, स्त्रीच्या शरीरावरील पुरुषाची मालकित्वाची भावना अधोरेखित करणं. सर्व घटनांमध्ये पुरुषांच्या मनात कामवासना असते, म्हणून केवळ तो बळजबरी करत नसतो, तर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी व स्त्रियांवर दुय्यमत्व लादण्यासाठी असंख्य पुरुषांकडून बलात्कार केले जातात.......